एकनाथ शिंदेंची नार्वेकरांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; घातली ‘ही’ महत्वाची अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका देत आपल्या आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. दरम्यान त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी आज सुरतमध्ये हॉटेलमध्ये जाऊन शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत शिंदे यांच्याशी त्यांच्याकडून तब्बल वीस मिनिटे चर्चा केली जात आहे. या चर्चेवेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजपसोबत सरकार बनवा, अशी महत्वाची मागणी शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी आज शिंदे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेवेळी शिंदे यांनी नार्वेकर व फाटक यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचाही मागणी केली आहे तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यानी भाजप सोबत येऊन हिंदुत्वाच्या मुद्यांवर सत्ता स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत यावे आणि महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे अशी अट घातली असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे.

Leave a Comment