Electric Vehicles : ‘या’ कारणांमुळे लागते आहे इलेक्ट्रिक गाडयांना आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Vehicles) आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामागची कारणे शोधण्यासाठी सरकारकडून एक तपास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक तपासणीत जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल/डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीच्या या रिपोर्टमुळे आता ईव्ही दुचाकी उत्पादक अडचणीत येऊ शकतात.

आग लागण्याच्या अनेक घटनांमध्ये ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही आणि ओला इलेक्ट्रिकच्या ई-स्कूटर्सचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की,” तज्ञ आता ईव्ही उत्पादकांसोबत त्यांच्या वाहनांमधील (Electric Vehicles) बॅटरीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैयक्तिकरित्या काम करतील.”

गेल्या महिन्यात, तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात ईव्ही इलेक्ट्रिक दुचाकीच्या (Electric Vehicles) बॅटरीचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. तेलंगणातील बॅटरी स्फोट प्रकरणासह जवळपास सर्वच घटनांमध्ये समितीच्या सदस्यांना बॅटरी सेलच्या डिझाइनमध्ये तसेच बॅटरीमध्ये दोष आढळला आहे.

Multiple electric scooter fire incidents reported in India, govt orders investigation - Explained | Electric Vehicles News | Zee News

ओला इलेक्ट्रिकने (Electric Vehicles) याआधीच 1,441 वाहने परत मागवली आहेत जेणेकरून त्या विशिष्ट बॅचच्या स्कूटर्सची चाचणी घेता येईल. “आमचा बॅटरी पॅक आधीपासूनच सर्व स्टँडर्ड्सशी सुसंगत आहे आणि भारतासाठी नवीन प्रस्तावित स्टँडर्ड्स AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे, तसेच युरोपियन स्टँडर्ड्स ECE 136 चे अनुपालन आहे,” कंपनीने म्हटले आहे. ओकिनावा ऑटोटेकने अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा : धक्कादायक !!! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा लागली आग, संपूर्ण शोरूमच जळून खाक

हे ही वाचा : ई-स्कूटरमधील आगीच्या घटनांबाबत सरकारची कडक भूमिका, कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय