व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Electric Water Taxi : मुंबईच्या समुद्रात धावणार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी; पहा काय आहेत वैशिष्ट्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा क्रेज सर्वांमध्ये वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने हे पर्यावरणासाठी पूरक देखील आहेत. त्यामुळे याची खरेदी ही अधिक होते. आधी इलेक्ट्रिक टू व्हीलर आली मग इलेक्ट्रिक कार आली त्यानंतर इलेक्ट्रिक बस आली असे नवनवीन इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध होऊ लागले. आता तर केवळ रस्त्यावरच इलेक्ट्रिक वाहन धावणार नसून त्याची पोहोच समुद्रपर्यंत गेली आहे. होय आता मुंबईच्या समुद्रात इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी (Electric Water Taxi) धावणार आहे. ही टॅक्सी कशी आहे? तिचे वैशिष्ट्य काय आहेत? याबद्दल जाणून घेऊयात.

कशी आहे ही टॅक्सी? Electric Water Taxi

ही एक वॉटर टॅक्सी (Electric Water Taxi) असून ती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसद्वारे चालवली जाणार आहे. या बोटीचा काही भाग हा पाण्याच्या खाली असणार आहे. जेणेकरून बोट खडकाला आदळू नये. या विचाराने हिची निर्मिती केली आहे. सध्या 50 बोटींचे उत्पादन केले गेले आहे. ही वॉटर टॅक्सी एकूण 24 सीटरची असणार आहे. या टॅक्सीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी समुद्राखालून 12 नॉट्सच्या वेगाने फिरू शकते. तसेच एका चार्जवर ही टॅक्सी सलग चार तास धावू शकते. त्यामुळे हिची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

तब्बल 2.8 कोटींची आहे टॅक्सी

सध्या 50 बोटींची निर्मिती करण्यात आली असून त्यातील 2 बोटींची चाचणी ही गोव्यात आणि 2 बोटींची चाचणी कोची मध्ये केली जात आहे. या एका वॉटर टॅक्सीची किंमत अंदाजे 2.8 कोटी रुपये एवढी आहे. ही टॅक्सी दक्षिण मुंबईतील नवी मुंबई मार्गावरील बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे प्रवाश्यांचा समुद्री प्रवास हा अत्यंत सुखाचा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईचा प्रवास  होणार एका तासात पूर्ण

मुंबईला जायचे म्हणजे त्या भरमसाठ ट्रॅफिकमधून वाट काढत जावे लागते. परंतु वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर हा प्रवास अकदी सोपा आणि सोयीचा होणार आहे. या वॉटर टॅक्सीने नवी मुंबई दरम्यानचा प्रवास हा केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. तसेच ही टॅक्सी सुरु केल्यानंतर यात लोकांना आणखी सुविधा मिळणार आहेत. तसेच प्रवासासाठी एक नवीन मार्ग उपलब्ध तोही विना ट्रॅफिकचा निर्माण होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जाईल अशी अशा आहे.