मराठवाडी धरणस्थळावरील अकरा कामगार कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या मराठवाडी धरणाचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरु आहे. या धरणावर महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कामगार काम करीत आहेत. सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या विळख्यात येथील कामगारही सापडले असून मंगळवारी धरणस्थळावरील अकरा कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कामगाराणा कोरोनाची बाधा झाल्याने धरणव्यवस्थापन व विभागातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या बांधकामाच्या परिसरात कामगार काम करण्यासाठी राहिलेले आहेत. या कामगारांमधील तीन जणांना सहा दिवसांपूर्वीपासून त्रास जाणवू लागला. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने इतर चाळीस कामगारांची कोरोना चाचणी केली. त्या चाचणीत त्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर धरण व्यवस्थापनाने उर्वरित कामगारांच्या सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल केले.

मराठवाडी धरणावरील कामगारांना कोरोनामुळे त्रास होऊ लागल्यामुळे याचा परिणाम हा धरणातील बांधकामावर जाणवू लागला आहे. कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सँबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव व त्यांचे सहकाऱ्यांनी धरणावरील कामगारांची तपासणी केले असता त्यातील आठजण पॉझिटिव्ह आढळले. त्या कामगारांमधील काहींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. धरणावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी आढळलेल्या अकरा कर्मचाऱ्यांपैकी तीन जणांवर उपचार सुरु आहेत. तर अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या २० जणांची आरटीपीसीआर टेस्टही घेण्यात आली आहे. अकराही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची चार दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. धरण व्यवस्थापनाने कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंतुनाशकांचीही फवारणीकरण्यात आलेली आहे.

Leave a Comment