या शहराला बाण नाही खान पाहिजे :इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी |काल किराडपुरा भागात आमदार इम्तियाज जलील यांची तुफानी सभा झाली. मुस्लिमेतर मतांचा जोगवा मागताना विकासाचा विषय पुढे करणारे जलील या सभेत केवळ ‘कॉम’ या एका विषयाला धरून 35 मिनिट 52 सेकंद बोलले. या शहरातील निवडणुका ‘खान की बाण’ या विषयावर गेली वीस वर्षे लढली गेली, असे सांगत त्यांनी किराडपुऱ्याच्या जनतेच्या साक्षीने ‘बाण तुटणार, आता औरंगाबाद खानच खासदार देणार आहे’ अशी थेट घोषणा करून टाकली.

एवढ्यावर न थांबणारे जलील यांनी 23 मे ला ‘एमआयएम’ चे सेलिब्रेशन कसे असेल याची झाकीही दाखवली. असा ‘जशन’ या शहराने पाहिला नसेल असा आनंद व्यक्त करू, असे ही ते बोलून गेले. पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख तर केलाच, पण 1980 नंतर शहराने मुस्लिम खासदार कसा असतो हे पहिलेले नाही, ते आम्ही दाखवू , हा एल्गार त्यांनी केला.

23 मे ला मिळणारा मुस्लिम खासदार संसदेत जाऊन असद ओवेसी यांचे हात येथिल मुसलमानांच्या साथीने बळकट करणार असल्याचे जलील म्हणाले. देश आणि धर्म या दोन बाबीत फरक करणारी जोडगोळी संसदेच्या वेलमध्ये गोंधळ घालत असल्याचा भास मला हे भाषण ऐकताना झाला.

आश्चर्य याचे वाटते, विकसनशील चेहेरा म्हणून आमच्या मूर्ख समाजापुढे वावरणारे जलील यांनी 35 मिनिटांच्या भाषणात विकासाबाबत ब्र ही काढला नाही. नंतर जो ‘नारा ए तकबीर’ चा एल्गार त्यांनी केला, तो कोणत्याही हिंदूंच्या काळजाला धडकी भरवणारा ठरावा. क्षणासाठी हा आवाज शहराच्या ‘आपल्या’ भागांमध्ये कसा घुमेल, याचा विचार मनात आला. आगामी 6 दिवस प्रत्येक मुसलमानाला आपले नाव ‘इम्तियाज जलील’ असे ठेवण्याची भावनिक साद घालून त्यांनी भाषण संपवले.

Leave a Comment