सातारा नगरपालिका कोमात अतिक्रमण जोमात : खंडोबा मळावरील अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा नगरपालिका कोमात अतिक्रमण जोमात अशी परिस्थिती सातारा खंडोबाचा माळ येथे दिसून येत आहे. याठिकाणी 21 अनाधिकृत गाळे बांधकाम करण्यात आले आहे. तरीही सातारा नगरपालिका गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

साताऱ्यातील रविवार पेठ मुख्य रस्त्यालगत खंडोबा माळावर नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर सुमारे 21 गाळे बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत. नव्याने झालेल्या गाळ्यात बद्दल तक्रार वाढली असल्याचे दिसत आहे. नगरपालिकेने गाळे हटवण्यासाठी नोटीस दिल्या असून सातारकरांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे.

शहरात अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सातारा शहरातील रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असतानाही अतिक्रमण विभाग गांधारीच्या भूमिकेत का असा सवाल सातारकर विचारत आहे.

स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी हे बांधकामाबाबत गप्प का? त्यांचाच वरदहस्त या गाळ्यांना आहे का? कोणाची टक्केवारी चालू आणि कोणाला पाकीट मिळते असे स्थानिक लोकांच्यातून प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे.

रविवार पेठ येथील खंडोबा माळ येथे सुमारे 21 गाळे पत्रावर सेंटर लावून बेकायदेशीरपणे उभारले आहे. या गाळ्यांचे काम सुरू असताना नगरपालिकेकडे अनेकांनी तक्रारी केल्या. तरीही नगरपालिका त्याकडे लक्ष देत नव्हते. तेव्हा या बांधकामला नेमका याला कोणाचा आशीर्वाद आहे, आणि नेमका कुणाला प्रसाद मिळणार हेच आता पाहायला मिळणार आहे.

एकीकडे सकाळी पहाटे भरणारी मंडई नगरपालिकेला दिसते. तिथे बसणारे शेतकरी नगरपालिकाला दिसतात. तेथे अतिक्रमण करतात म्हणून त्यांचे काटे उचलले जातात. शेतकऱ्याचे नुकसान केलं जाते. अशावेळी व्यावसायिकांचे खिसे भरले जातात याचंच उदाहरण खंडोबा माळावर तुम्ही पहायला मिळत आहे. जसे शेतकऱ्यांचे काटे उचलले जातात तसेच या जागेवर बुलडोझर फिरणार का ? असा प्रश्न स्थानिक लोकांना आणि सातारकर विचारत आहेत. तेव्हा आता यावर नगरपरिषद काय कारवाई करणार याकडे सातारकरांचे लक्ष वेधले आहे.

You might also like