‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज हैदराबादच्या ताफ्यात ; प्रतिस्पर्धी संघाला भरणार धडकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी काही दिवसच शिल्लक असून प्रत्येक संघ आता जोरदार तयारीला लागला आहे. दरम्यान 2 वेळा आयपीएल जिंकलेल्या सनरायजर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर जेसन रॉय यंदा हैदराबाद कडून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श ची रिप्लेसमेंट म्हणून रॉय ची निवड करण्यात आली आहे.

जेसन रॉय हैदराबादच्या संघात दाखल झाल्यानंतर हैदराबादचा संघ खूपच मजबूत झाला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन , आणि जॉनी बेअरस्टा यांना आता जेसन रॉयची साथ मिळाल्याने प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच धडकी भरेल.

इंग्लंडकडून ओपनिंगला येऊन सुरुवाचीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करण्यात जेस रॉय माहिर आहे. पॉवरप्लेमध्ये तो आक्रमक फटके खेळण्यात तरबेज आहे. जागेवरुन षटकार ठोकण्यातही तो माहिर आहे. चौकार आणि षटकारांनी तो अधिक धावा करतो. जेसन रॉयने आतापर्यंत 8 मॅचेसमध्ये 179 रन्स केले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like