अक्षर-अश्विनच्या फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताला विजयासाठी फक्त 49 धावांची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम भारतीय फलंदाजी कोसळल्या नंतर भारतीय गोलंदाजांनी देखील अचूक गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजाना देखील अक्षरशः लोटांगण घालायला लावले. इंग्लंडचा संपूर्ण डाव फक्त 81 धावांवर आटपला असून भारतीय संघाला विजयासाठी 49 धावांची गरज आहे.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या फिरकी पुढे इंग्लिश फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. अश्विनने 4 तर अक्षर पटेल ने 5 बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदर ने 1 बळी घेतला. इंग्लंड कडून बेन स्टोक ने सर्वाधिक 25 धावा केल्या.

दरम्यान भारतीय संघाला आता विजया साठी फक्त 49 धावांची गरज आहे. हा कसोटी सामना 2 दिवसांत संपू शकतो अशी चिन्हे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like