आदित्य ठाकरेंचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र; केली ही” महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. अशात कोरोना परिस्थितीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहले आहे. कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार करावा. तसेच, लसीकरणात किमान वय हे 15 वर्ष करावे, असे पत्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना लिहले आहे.

आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेला पत्रात तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्या म्हणजे, फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य सेवा कर्मचारी, ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. त्यांना तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. लसीकरणाचे किमान वय साधारण 18 आहे. ते वय 15 वर करावे. जगभरात काही ठिकाणी करण्यात आले आहे. आपल्याकडे लसीकरणाचे किमान वय 18 वर्ष आहे. शारीरिकदृष्ट्या 15 आणि 18 मध्ये तेवढा फरक लहान मुला-मुलींमध्ये पडत नाही.

मुंबईत पहिला डोस 100 टक्के झाला आहे, तर दुसरा डोस 73 टक्के झाला आहे. जर चार आठवड्यांपर्यंत दोन डोस मधील अंतर कमी केले; जसे बाहेर जाणाऱ्यांसाठी जसे केलेले आहे, तसे मुंबईत 15 ते 20 जानेवारीपर्यंत दुसरा डोस पूर्ण करु शकतो, असा विश्वास मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.