व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील करोडो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत दिलासा दिला आहे.

पेन्शनधारक आपले लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करू शकतात. यापूर्वी पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागत होते. कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट द्यावे लागते. पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे यावरून दिसून येते.

एक वर्षाची व्हॅलिडिटी
EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, EPS-95 चे पेन्शनधारक आता कधीही लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. ते सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल. म्हणजेच आता नोव्हेंबर महिन्यातच कोट्यवधी पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.

तुम्ही येथे सादर करू शकाल लाइफ सर्टिफिकेट
पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. याशिवाय बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येही ते जमा करता येणार आहे.

घर बसल्याही जमा करता येते
तुम्ही घर बसल्याही लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता. यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाच्या मते, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या डोअरस्टेप सेवा वापरून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात.