Siri आणि Alexa प्रमाणे काम करेल EPFO चे उमंग अ‍ॅप, आता व्हॉईस कमांड फीचरद्वारे मिळेल सर्व माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उमंग म्हणजेच युनिफाइड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अ‍ॅप लवकरच व्हॉईस कमांड फिचर जोडेल. हे फीचर अ‍ॅड केल्यानंतर यूजर्स अ‍ॅपलच्या सिरी आणि अ‍ॅमेझॉनच्या अलेक्सासारखेच हे अ‍ॅपही वापरू शकतील. जी लोकं सध्या उमंग अ‍ॅप लिहून वापरू शकत नाहीत, त्यांना या व्हॉईस कमांड फीचरचा खूप फायदा होणार आहे.

सध्या उमंग अ‍ॅपच्या मदतीने 13 सरकारी योजना किंवा सर्व्हिसेसची माहिती मिळवता येते. याद्वारे EPFO, जनऔषधी, ईएसआयसी, कोविन, अटल पेन्शन योजना आणि ई-रक्तकोश यांसारख्या योजनांशी संबंधित कामे पूर्ण करता येतील. उमंग अ‍ॅपच्या मदतीने, EPFO मेम्बर त्यांचा पीएफ बॅलन्स देखील तपासू शकतात, UAN साठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या क्लेमचे स्टेट्स तपासू शकतात. इतकेच नाही तर याच्या मदतीने ते लाईफ सर्टिफिकेटसह इतर ईपीएफओ सेवांचा लाभही घेऊ शकतात.

भारत सरकारच्या उमंग अ‍ॅपचा उद्देश सर्वसामान्यांना सरकारी सेवा सहपणे मिळवणे हा आहे. याच्या मदतीने केंद्र आणि राज्यांच्या सर्व सरकारी विभागांचे फायदे आणि त्यांच्या सेवा सर्वसामान्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उमंग अ‍ॅप अंतर्गत आतापर्यंत 13 सर्व्हिसेस आणल्या गेल्या आहेत. लवकरच आणखी नवीन सर्व्हिसेस देखील उमंगशी जोडल्या जाऊ शकतात.

पहिले हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हॉईस कमांड येईल
उमंग अ‍ॅपला आणखी युझर फ्रेंडली बनवण्यासाठी सरकार जोमाने काम करत आहे. सुरुवातीला उमंग अ‍ॅपमधील व्हॉईस कमांड्स फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. हिंदी आणि इंग्रजीमध्ये या सर्व्हिसेस सुरू केल्यानंतर आठ महिन्यांत देशातील इतर 10 प्रमुख भाषांमध्ये व्हॉईस कमांड सर्व्हिसेस सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

‘हे उमंग’ म्हणत कमांड द्या
उमंग अ‍ॅपमध्ये व्हॉईस कमांड फीचर जोडल्यानंतर, बोलून, व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करणे, व्हॅक्सिनेशन स्लॉट बुक करणे, भविष्य निर्वाह निधी पासबुक पाहणे आणि क्लेमचे स्टेट्स जाणून घेणे इत्यादी अनेक गोष्टी करता येतात. याद्वारे युझर्स ‘हे ​​उमंग’ असे म्हणत कमांड देऊ शकतील. ‘हे उमंग’ बोलल्यानंतर युझर्सना काय काम करावयाचे आहे ते सांगावे लागेल.

Leave a Comment