वय अवघे बारा वर्ष तरीही डोळ्यात धूळ फेकत उडवले सव्वा लाख

औरंगाबाद – विद्युत मोटार खराब झाल्याने तिकडे पाहण्यासाठी जाताच पेट्रोल पंप आत शिरलेल्या एका 12 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने काउंटर मधील तब्बल एक लाख 33 हजार 580 रुपयांची रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार आझाद चौकातील ईसार पेट्रोल पंपावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

आझाद चौकाजवळील ईसार पेट्रोल पंपावर मुदस्सीर खान शकील खान (24) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सायंकाळी 5 नंतर पेट्रोल पंपाच्या केबिनमधील काउंटर मध्ये त्यांनी रोकड जमा केली. त्याच दरम्यान पंपावरील कामगार शेख सलीम समशोद्दीन यांनी सांगितले की, विद्युत मोटर खराब झाली आहे. त्यामुळे मुदस्सीर हे मोटार पाहण्यासाठी पैठण गेटला दुरुस्तीसाठी टाकायला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी काउंटरची तपासणी केली तेव्हा त्यातील रोख चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे पंपावरील सीसीटीव्हीचे तपासणी करण्यात आली त्यात एका 12 वर्षीय बालकाने रोकड लांबवण्याचे समोर आले.

त्यावरून मुदस्सीर यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, सहाय्यक फौजदार हेमंत सुपेकर यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी आज सकाळी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like