व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘आजही देशात काँग्रेसच बाप’; नाना पटोले यांचा टोला

औरंगाबाद – महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी नवरा, तर शिवसेना बायकोच्या भूमिकेत असून काँग्रेस ही बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आघाडीला लगावला होता. त्याला उत्तर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. ते म्हणाले, भाजप देशात काँग्रेसने केलेल्या विकास कामावरच आपले ढोल वाजवत आहे. आजही देशात काँग्रेस बापच आहे, सुजय विखे अजून लहान आहेत, असा खोचक टोला पटोलो यांनी विखेंना लगावला आहे.

औरंगाबाद येथे पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पटोले आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आहे. मोदींनी गुजरातमध्ये दबावाचे, सूडाचे जे राजकारण राबवले तो पॅटर्न ते विरोधकांना संपवण्यासाठी वापरत आहेत. वास्तविक स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने केलेल्या विकासामुळेच देश प्रगती पथावर दिसत आहे.

देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. गलवान खोऱ्यात चीनकडून भारतीय जवानांना क्रूरतेने मारले. एक मारला, तर शंभर मारु अशी भाषा करणारे गप्प राहिले आहेत, अशी टीका पटोले यांनी मोदींवर केली.