शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते.

या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न हा शिक्षणासंबंधी असतो. ग्रामीण भागातील तरुणांचे स्थलांतरही रोजगाराच्या दिशेने शहरात होत असते, आणि तरुणांना शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक खर्चाचा प्रश्न निर्माण होतो. अनेक तरूणंाचे शोषण होताना दिसते, त्यांना शिक्षण व रोजगार मिळण्यासाठी सर्वांनी तरुणाईला साद घातली पाहिजे.

वक्ते छाया कावीरे यांनी, तरूणांचे शहरात स्थलांतर, शिक्षणाचे महत्त्व, स्त्रीयांचे प्रश्न, ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, तरुणाची गळचेपी असे ग्रामीण भागातील अनेक मुद्द्यावर त्यांनी आपल्या वेगवेगळ्या रूपाने सांगितले.

अश्पाक कुरेशी यांनी, तरुणाईची वाढती बेरोजगारी बघून सर्वांनी एकजुटीने संघटित होऊन तरुणांसाठी लढावे लागेल असे म्हटले. त्यावेळी जिंतेद्र पवार यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरिहंत, मलकापुरे, आभार महेश बनकर यांनी केले यावेळी डाॅ बाबा आढाव, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like