व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खळबळ उडाली : शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 असावे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

कराड बसस्थानक परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदाचित गारठ्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तरीही शवविच्छेनद आवाहल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.