Tuesday, January 31, 2023

फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये बातमीसाठी घातली बंदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींशी केली चर्चा

- Advertisement -

नवी दिल्ली । शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott morrison) यांनी फेसबुकवर (Facebook) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) युझर्सवर बंदी घातल्यानंतर ही बंदी उठविण्याची विनंती केली. ऑस्ट्रेलियात न्‍यूज दाखविण्यासाठी पैसे देण्याच्या कायद्यावर चिडून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने र्व वृत्त वेबसाईटवर बातमी पोस्ट करण्यास बंदी घातली आणि स्वतःचे पेजही ब्लॉक केले. त्यानंतर फेसबुक, मीडिया आणि शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वाद वाढला आहे. यापूर्वी गुगलनेही हे वादग्रस्त कायदे लागू करण्यात आल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये आपले सर्च इंजिन बंद करण्याची धमकी दिली होती. मॉरिसन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीदेखील फेसबुक वादाबद्दल चर्चा केली असून ते ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तावित कायद्याबद्दल ब्रिटन, कॅनडा आणि फ्रान्सच्या नेत्यांशीही बोलणी करणार आहेत. ते म्हणाले की,”त्यांचे सरकार देशातील टेक कंपन्यांच्या धमक्यांना घाबरत नाही.”

पंतप्रधान कॉट मॉरिसन यांनी फेसबुकला बातमी प्रकाशित करणाऱ्या व्यवसायांशी बोलणी सुरू करण्यास सांगितले. यासह, बातमी शेअर करण्याच्या मोबदल्यात डिजिटल कंपन्यांकडून शुल्क वसूल करण्यासाठी त्यांच्या सरकारच्या आदेशांचे पालन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ऑस्ट्रेलियन सरकार आणि फेसबुक यांच्यात सुरू असलेल्या वादाचे कारण म्हणजे न्यूज कन्टेन्टच्या पेमेन्टचा कायदा आहे, ज्यामध्ये जर फेसबुक त्याच्या प्लॅटफॉर्मवर एखादी बातमी शेअर करत असेल तर त्याला संबंधित मीडिया कंपनीला पैसे द्यावे लागतील.

- Advertisement -

ते म्हणाले, “ऑस्ट्रेलिया काय करीत आहे याबद्दल अनेक देशांना रस आहे. म्हणून मी गूगलप्रमाणेच फेसबुकलाही रचनात्मक मार्गाने बोलणी करण्यासाठी आमंत्रित करतो कारण ऑस्ट्रेलिया येथे काय करणार आहे याचे अनुसरण अनेक पाश्चात्य देश करू शकतील. मॉरिसन ने ऑस्ट्रेलियाच्या लोकांपर्यंत बातमी पोहोचविणे आणि शेअर करणे थांबवणे याला एक धोका असे म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.