Facebook देतंय 50 लाखांचं कर्ज; कसा करायचा अर्ज? व्याजदर काय? जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकचा वापर आपण फोटो, व्हिडिओ आणि status शेअर करण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही हमीशिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

फेसबुकने लघु व्यवसाय कर्ज उपक्रम सुरू केला आहे. यासाठी त्यांनी Indifi सोबत भागीदारी केली आहे. यापूर्वी फेसबुकने केवळ 200 शहरांमध्ये कर्ज सेवा सुरू केली होती आणि आता ती 329 शहरांमध्ये विस्तारली आहे. कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. कर्जासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

फेसबुक किंवा मेटा स्वतः कर्ज देत नाही, तर कर्ज इंडिफी कंपनी देते. याद्वारे तुम्हाला 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. कर्जावर 17 ते 20 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. महिला उद्योजकांना व्याजदरात 0.2% सूट मिळेल. एकदा तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला फक्त एका दिवसात पुष्टीकरण मिळेल. उर्वरित कागदपत्रे फक्त 3 दिवसात पूर्ण केली जातील.

कोण कर्ज घेऊ शकतो-
या कर्जासाठी फेसबुकने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या सेवा नेटवर्कसह भारतीय शहरात असावा. दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अॅपशी किमान गेल्या 6 महिन्यांपासून कनेक्ट आहात आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करत आहात. या कार्यक्रमांतर्गत फक्त लहान उद्योजकांनाच कर्ज मिळणार आहे.

याप्रमाणे अर्ज करा-
कर्जासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
यासाठी तुम्हाला Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावे लागेल.
तुम्ही Apply Now वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल.
यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
मागितलेली माहिती भरून ती सादर करावी लागेल.
तुम्ही कर्जासाठी पात्र असल्याचे समजल्यास, कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

Leave a Comment