Monday, January 30, 2023

फेअर अँड लव्हली गर्ल यामी अडकली विवाह बंधनात; ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत बांधली जन्मोजन्माची गाठ

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फेअर अँड लव्हली हि जगभरातील अत्यंत लोकप्रिय फेअरनेस क्रीम आहे. याच्या जाहिरातींनी नेहमीच काहीतरी वेगळे पण प्रेक्षकांना ओढून घेणारे कन्टेन्ट दिले आहेत. याच जाहिराती दरम्यान त्यात दिसणारी तरुणी काही दिवसांनी चक्क फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. हि तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून आआजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री यामी गौतम आहे. पण आता यामी नुकती यामी नाही राहिलेली. आता ती मिसेस आदित्य झाली आहे. होय.. यामी नुकतीच विवाह बंधनात अडकली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे हि बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने लोकप्रिय चित्रपट उरीचा दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्न केले आहे.

- Advertisement -

यामीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यासोबत हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो. मैत्रीपासून सुरू झालेल्या या प्रवासाला आज एक नवे वळण मिळाले. तिच्या या पोस्टनानंतर तिच्या चाहत्यांनी या दोघांनाही भरभरून शुभाशीर्वाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर यामीच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील तिच्या अनेक मित्र मैत्रिणी तसेच सहकलाकारांनीही त्या दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री यामी गौतमला फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातींमधून विशेष ओळख मिळाली. यानंतर सरकार ३, टोटल सियाप्पा, ऍक्शन जॅक्सन, बदलापूर, बाला, विकी डोनर, गिन्नी वेड्स सन्नी आणि सनम रे या आणि यांसारख्या अनेक चित्रपटात तिने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड आधी यामी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही झळकली होती.

तर यामीचा पती अर्थात आदित्य धर याने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. तर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे त्याने उल्लेखनीय असे दिग्दर्शन केले आहे.

यामीने उरी द सर्जिकल स्ट्राईक या आदित्यने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. याच दरम्यान त्यांच्या मैत्रीच्या पुढील नात्याची सुरुवात झाली आणि अखेर काल हे दोघेही एकमेकांच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्थानबद्ध झाले.