Fake Sabudana : बनावट साबुदाणा आरोग्यासाठी आहे हानिकारक, अशा प्रकारे ओळखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुतेक लोकं कोणत्या ना कोणत्या करणास्तव उपवास करत असतात. या उपवासादरम्यान अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्ले जातात. त्यातीलच एक साबुदाणा देखील आहे. उपवासात अनेक लोकं खिचडी, खीर, वडे असे साबुदाण्याचे पदार्थ खातात. काही लोकं तर एक टाईमपास स्नॅक्स म्हणूनही खातात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की जर हा साबुदाणा खराब असेल तर…

हे लक्षात घ्या कि, आजकाल बाजारात अनेक ठिकाणी भेसळयुक्त साबुदाणा मिळतो. जो ब्लिचिंग, हायपोक्लोराईट, कॅल्शियम, सोडियम, हायपोक्लोराईट,एजंट, फॉस्फोरिक, एसिड इत्यादींचा वापर करून तयार केला जातो. अशा रसायनांपासून बनवला गेलेला साबुदाणा आपल्याला व्यवस्थित ओळखता येत नाही. त्यामुळे खरा आणि बनावट साबुदाणा कसा ओळखावा ? हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. चला तर मग भेसळयुक्त साबुदाणा कसा ओळखावा हे आपण समजून घेऊयात. Fake Sabudana

तसे पहिले तर साबुदाणा हा एक शाकाहारी पदार्थ आहे. जो उपवासा दरम्यान वापरला जातो. आजकाल बाजारात भेसळयुक्त साबुदाणा अगदी सहजपणे मिळत आहे. जो दिसायला अतिशय चमकदार आणि पॉलिश केलेल्या पांढऱ्या मोत्यासारखा असतो. साबुदाणा टॅपिओकापासून काढलेल्या स्टार्टरपासून बनवला जातो. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आणि चरबीचे प्रमाण कमी असते. याचा वापर अनेक प्रकारच्या आजारांमध्येही केला जातो. साबुदाणा खाल्याने आपल्याला झटपट ऊर्जा देखील मिळते.

भेसळयुक्त साबुदाणामध्ये ब्लीचिंग एजंट्स तसेच अनेक रसायने असतात जे पांढरे आणि चमकदार मोत्यांसारखे दिसतात. जे कृत्रिम पांढऱ्या रंगाच्या सहाय्याने बनवले जातात. असा भेसळयुक्त साबुदाणा खाल्ल्याने आपल्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होते. असा भेसळयुक्त साबुदाणा आपल्या शरीरात अनेक विषारी द्रव्ये तयार करतो, ज्यामुळे शरीराच्या अनेक भागांना इजा होते. त्यामुळे पक्षाघातही होऊ शकतो. तसेच असा भेसळयुक्त साबुदाणा वारंवार खाल्याने किडनीशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतात. यामुळे हृदयविकार, किडनी निकामी आणि मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणूनच खरा साबुदाणा ओळखून अशा भेसळयुक्त साबुदाण्यापासून नेहमी दूर राहा.Fake Sabudana

बनावट साबुदाणा कसा ओळखावा?
बनावट साबुदाणा चावून ओळखता येतो. यासाठी, थोडासा साबुदाणा तोंडात ठेवून थोडा वेळ चघळा, जर तुम्हाला कडकपणा वाटत असेल तर त्यात भेसळ असेल. कारण नैसर्गिक साबुदाण्या वरील स्टार्च काही वेळ चघळल्यानंतर निघून जातो आणि जो दातांना चिकट वाटू लागतो. जर असे झाले तर समजून घ्या की हा खरा आहे.

याशिवाय आपल्याला जाळूनही साबुदाणा टेस्ट करता येईल. त्यासाठी थोडासा साबुदाणा घेऊन त्याला आग लावा. जर तो फुगला तर तो शुद्ध असेल आणि तसे न झाल्यास तो भेसळयुक्त असल्याचे सिद्ध होईल. तसेच काही काळ जाळल्यानंतर भेसळयुक्त साबुदाण्याची राख होते. खरा साबुदाण्याची कधीच राख होत नाही. तसेच खरा साबुदाणा जाळल्यानंतर त्यातून चांगला वास येतो, तर भेसळयुक्त साबुदाणा जाळल्यानंतर त्यातून धूर निघतो.