जन्मदातेच ठरले हत्यारे..! प्रसिद्ध इराणी दिग्दर्शकाची माता पित्याने केली निर्घृण हत्या, केवळ एक नकार ठरले कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोरामद्दीन यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केवळ लग्न करण्यासाठी नकार दिला म्हणून हि हत्या करण्यात आली आहे. यापुढील धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या त्यांच्याच आईवडिलांनी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी स्वतःहून ह्या घटनेबाबत कबुली दिली आहे. पोलिसांनी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांच्या पालकांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील सखोल चौकशी करत आहेत. बबाक यांनी २००९ साली फॅकल्टी ऑफ फाईऩ आर्टस् ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ तेहरान येथून मास्टर्स डिग्री प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी काही शॉर्ट फिल्म्सही तयार केल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.facebook.com/Abiyamo/photos/a.292520534832412/975142716570187/

बबाक खोराम्मदीन यावेळी ४७ वर्षीय होते. ते अनेक वर्षे इंग्लंड येथे वास्तव्यास होते. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते. दरम्यान त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्या लग्नावरून वाद सुरु झाले. बबाक यांचे लग्न व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती.

https://www.facebook.com/DailyMail/posts/7044176272308727

पण बबाक वारंवार लग्नाला नकार देत असल्यामुळे अखेर सामाजिक प्रतिष्ठेकरिता त्यांच्या पालकांनीच त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलले. त्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना कॉफीमधून गुंगीचे औषध दिले गेले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केले व ते कचऱ्याच्या पिशवीत भरले. ही पिशवी पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. चौकशीच्या अखेरीस बबाक यांच्या आई – वडिलांनी अखेर आपला गुन्हा मान्य केला.

बबाक अविवाहित होता. त्याला आम्ही वारंवार लग्न करण्याबाबत विचारायचो पण तो आमचे म्हणणे ऐकायला तयार नव्हता. यामुळे आम्हाला मानसिक त्रास होत होता. याचा परिणाम आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही होत होता. घराबाहेर पडू नये असे वाटायचे. त्यामुळे मी आणि त्याच्या आईने आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून त्याला जीवे मारून टाकायचे ठरवले. याचा आम्हाला अजिबात पश्चाताप होत नाही, असा दावा बबाक यांच्या वडिलांनी न्यायालयासमोर केला आहे, अशी माहिती तेहरान क्रिमिनल न्यायालयाचे प्रमुख मोहम्मद शहरयार यांनी दिली.

Leave a Comment