लॉकडाऊनमुळे कर्ज न फेडू शकल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद :लॉकडाऊनमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घराशेजारील खळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली आहे. भारत भगवान मोरे ( वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

भारत मोरे यांच्याकडे मॉक्रोफाईन्स आणि एका बँकेचे मिळवून 2 लाख रुपये कर्ज असल्याचे नातेवाईकांने सांगितले. मागील लॉकडाऊनच्या काळात हाताला काम मिळत नाही, कर्ज कसे फेडायचे ही चिंता मोरे यांना सतावत होती यामुळे त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वतःच्या खळ्यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या समोरच्या साईडने दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच घरच्यांनी ग्रामस्थांना बोलावले. दरम्यान पोलीस पाटील दिनकर एडके यांनी पाचोड पोलीस ठाण्यात याविषयी कळविले.

बिट जमादर सुधाकर मोहिते यांनी पाचोड पंचनामा करून मोरे यास गावकऱ्यांच्या मदतीने फासावरून खाली उतरवून पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकारी शिवाजी पवार यांनी तपासणी करून मृत घोषित केले. मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हान करीत हे आहेत.

Leave a Comment