शेतकरी मित्रांनो पेरूची लागवड करून कमवा लाखो रूपये; कसे ते जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या नुकसानामुळे आणि घटत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांची शेती करायची इच्छा मरून गेलीये. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कमी कालावधीमध्ये देखील जास्त उत्पादन देणाऱ्या फळझाडांची शेती करून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतो. यात जर तुम्ही पेरूची लागवड केली तर त्यात तुम्हाला नक्कीच नफा मिळेल.

ज्या शेतकऱ्यांना चिकू, मोसंबी, डाळिंब, आंबाड, अशा विविध फळांची शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होते. परंतु कमी खर्चात देखील आणि योग्य पद्धतीने पेरूची शेती कशी करायची याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पेरूची लागवड

पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील दहा महिने आपण कधीही करू शकतो. पेरूची लागवड करताना जमिनीची आखणी करून 6×6 मी अंतरावर 60×60×60 सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरण्यापूर्वी त्यात शेणखत 500 ग्राम, सिंगल सुपर फॉस्फेट 5 ग्राम, फोलिडोल पावडर आणि माती याचे मिश्रण घालावे. त्यामध्ये रोपांची लागवड करावी. जवळपास एक एकर मध्ये दोन हजार झाडांची लागवड आपल्याला करता येऊ शकते.

पेरूसाठी हवामान

पेरूच्या बागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल असते. यात आदर्श उत्पादनासाठी 15 ते 30 सेल्सिअस तापमान योग्य राहते. पेरूचे झाड कोरडे हवामान देखील सहन करू शकते. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे त्या ठिकाणी देखील पेरूचे पीक व्यवस्थित येते. असे सर्व हवामान तपासून आपण पेरूची लागवड केली तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो.

पेरू लागवडीतून नफा

एका हंगामात प्रत्येक रोपावर सरासरी 20 किलो पेरू लागतील. ते बाजारात पन्नास रुपये किलो दराने विकले जातील. किरकोळ बाजारात पेरूची किंमत 80 ते 100 रुपये आहे. अशा पद्धतीने बाराशे रुपयांमधून रोपांमधून 20 किलो दराने पहिल्या हंगामात 24,000 किलो पेरू मिळतील. हेच पेरू पन्नास रुपयांनी विकल्यास 25 लाख रुपये मिळतील. यात वार्षिक खर्च काढून टाकल्यास उरलेली रक्कम हा नफा असेल.