सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीसोबत त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात; राजू शेट्टींची मागणी

सांगली । ”सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात”, अशी मागणी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटवरुन जोरदार राजकारण रंगलेलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी आज इंदापूरात बोलत होते.

”सगळेच तथाकथित सेलिब्रिटी सरकारचं अनुदान घ्यायला सोकलेले आहेत. ज्यांना जनतेनं मोठं केलं आणि आज शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जनआंदोलन केलं असताना हे सरकारची बाजू घेत आहेत. त्या तथाकथित सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात”, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

दिलत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबात पाठिंबा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्वीट केलं होतं. त्याला भारतातील काही सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं. शेतकरी आंदोलन भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात ढवळाढवळ करण्याचे काम नाही असं या सेलिब्रिटींनी म्हटलं होत. भारतातील सेलिब्रिटिंनी केलेल्या या ट्वीटमध्ये साम्य असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यावर सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलीय.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like