शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला राज्यात सकारात्मक प्रतिसाद; ‘या’ ५ मोठया बाजार समित्या राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार 08 डिसेंबर रोजी संप असणार आहे. इतकंच नाही तर उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार असा संबंधित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामं कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप आणि व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मसाला, फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट बंद राहणार असून राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक, पुणे बाजारपेठ बंद राहणार अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी वर्ग व्यापार करतात. माथाडी कामगार कष्टांची कामे करतात. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील घटकांचा केंद्र सरकारने विचार करावा, या घटकांचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी व अन्य घटकांनी दिनांक 8 डिसेंबर रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावं, असं आवाहन माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. (Mumbai Navi Mumbai Turbhe 5 market committees will be closed on bharat bandh)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment