कांदा 40 तर वांगी 5 रुपये किलो; दर गडगडल्याने बळीराजा पुन्हा अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अगोदरच कष्ट करून पिकवलेल्या शेतमालावर अवकाळी पावसाने पाणी फिरवलं आहे. अशात आता शेतलास बाजारपेठेत लवडीमोल दर मिळत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे. कराडच्या बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 40 रुपये किलो दराने असलेले वांगे आता 5 रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे कातड तालुक्यातील अभयचीवाडीतील एक शेतकऱ्याने शेतातील वांगी चक्क गुरांच्या समोर टाकली आहे.

कराड तालुक्यातील अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी लावली होती. चांगला दर मिळेल आणि त्यातून आपल्याला चांगले पैसे मिळतील या आशेने रघुनाथने वांग्याची चांगली निगाही राखली होती. वांगी तोडणीला आल्यानंतर त्यांनी घरच्यांना सोबत घेऊन तोडणी केली. आणि कराड येथील बाजारात जाऊन वांग्याची विक्री केली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 40 रुपये किलो दराने त्यांनी वांगी विकली होती. आपल्या वांग्याला चांगला दर मिळत असल्याने रघुनाथ आनंदी होते.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पालेभाज्यांचे दर कमी होऊ लागले. यामध्ये वांग्याचेही दर कोसलळे. ज्या ठिकाणी ४० रुपये किलोने वांगी घालत होते त्या ठिकाणी आता फक्त ४ रुपये किलो दर मिळू लागल्याने रघुनाथ यांच्यावर संकटच कोसळले. परिणामी त्यांना शेतात लावलेली वांगी मार्केटला नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चही निघेनास झाला आहे. त्यामुळे हताश झालेल्या रघुनाथ यांनी आपल्या संपूर्ण शेतातील वांग्याची रोपे काढून टाकली. आणि रोपांना लागलेली भली मोठी वांगी गुरांसमोर खाण्यासाठी टाकली.

चांगला दर मिळेल म्हणून आम्ही शेतात वांगी, मिरची, काकडी, कारली अशी पिके लावली होती. मात्र, आता दर मिळत नसल्यामुळे गुरांपुढे वांगी टाकावी लागत आहेत, असे हताश झालेल्या शेतकरी रघुनाथ येडगे यांनी सांगितले.