शेतकऱ्यांनो शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर ना हरकत द्या, पाणंद रस्ता घ्या ः बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकर्यांनी साथ दिल्यास मागेल, त्याला पांदण रस्ता संकल्पना राबविण्यात येत आहे. तेव्हा आता केवळ १०० रूपयांच्या स्टॅम्पवर असे लिहून द्या, आम्ही सर्व शेतकरी या शेतापासून त्या शेतापर्यंत रस्त्यांची जमीन असेल. तेथे रस्ता करण्यास आमची हरकत नाही, असे म्हणा.  मग असे तुम्ही म्हटले की तुमचा रस्ता झालाचं समजा, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्याकरिता पाणंद रस्ते नसल्याने मोठ्या प्रमाणात चिखलातून जाऊन शेतीची मशागतीची कामे करावी लागतात. त्यामुळे आधीच दिवसभर शेतामध्ये राबराब राबणारा शेतकरी हा जाताना. तसेच येताना चिखल माती गोठ्यातून येत असतो . या सगळ्या गोष्टींचा त्याला मानसिक त्रासही होतोच . यासाठी सुरुवातीच्या शेतकऱ्यांनी जर थोड्याशा जागेवरुन पांदण रस्त्याला वाट मोकळी करून दिली, तर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर सर्व शेतकऱ्यांचं शेतामध्ये जाणं येणं सोपं होईल, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर मागेल त्याला पांदण रस्ता ही संकल्पना संपूर्ण शेतकऱ्यांना मिळू शकते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी साथ देण्याची गरज आहे. थोड्याशा जमिनीसाठी पांदन रस्ता थांबवू नका. मागेल त्याला पाणंद रस्ता देण्यात येणार आहे. संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांचे त्या चिखलात जात आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी सुरुवातीचा रस्ता न अडविल्यास इतर शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

Leave a Comment