Friday, June 9, 2023

ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना आता मिळणार भरपूर युरिया खत, याबाबत केंद्र सरकारचे नियोजन कसे आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खत असो वा खाद्यान्न, केंद्रातील मोदी सरकार देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने काम करीत आहे. 2014 मध्ये दिल्लीचे सिंहासन स्वीकारल्यानंतर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. विविध प्रकारच्या वाहतुकीचे जाळे पसरविणे असो वा शेतकऱ्यांना बाजाराशी जोडणे असो सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. ईशान्येकडील राज्यांतील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध करुन देण्यासाठी आता आसामच्या नामरूप मध्ये युरिया प्लांट तयार होणार आहे. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी याच्या कामांच्या प्रगतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या देशांमध्ये युरियाची निर्यातही करता येते
या युनिटमधून उत्पादित युरिया खताची देशांतर्गत मागणी पूर्ण झाल्यानंतर त्याची निर्यातही होऊ शकते, यावर आढावा बैठकीत जोर देण्यात आला. उत्पादित यूरिया खत देखील श्रीलंका, भूतान, मालदीव, नेपाळ आणि बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांच्या युरियाची आवश्यकता पूर्ण करू शकेल. बैठकीत आसाम सरकारने युरिया प्लांटच्या बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

नामरूपच्या या युरिया प्लांटची ही क्षमता असेल
आसामच्या नामरूप मध्ये तयार होणाऱ्या या यूरिया प्लांटची वार्षिक क्षमता 12.7 लाख एमएमटी असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी सर्व भागधारकांना हे काम वेगवान करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रामेश्वर तेली, आसामचे अर्थमंत्री हेमंत विश्व सरमा, आसामचे वाणिज्य व उद्योगमंत्री चंद्र मोहन पोटोवारी उपस्थित होते. याशिवाय OIL,RCF,BVFCL चे सीएमडी आणि NFL चे संचालकही बैठकीस उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.