Sunday, April 2, 2023

शेतकरी आंदोलनास्थळी पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

- Advertisement -

नवी दिल्ली । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस बानो यांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या सिंघू बॉर्डवर पोहोचल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे.

सोमवारी रात्रीसुद्धा सोशल मीडियावर बिल्किस आजींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या आजी शेतकऱ्यांच्या कुठल्याही आंदोलनस्थळी दिसत होत्या. तसेच या आजींसोबत असलेले लोक उत्तर प्रदेशहून परतत असताना शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी थांबल्याचे सांगताना दिसत होते. दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या बिल्किस बानो यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनावेळी बिल्किस बानो या चर्चेत आल्या होत्या. त्या केवळ खास प्रसंगीच शाहीनबागमध्ये उपस्थित राहात नसत तर सकाळपासून रात्रीपर्यंत आंदोलनस्थळी त्यांचीय उपस्थिती असे. त्यांनी या आंदोलनात अखेपर्यंत राहण्याची घोषणा केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’