शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील आणखी 3 फायदे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

आता लवकरच 10 वा हप्ता देखील तुमच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की, यामध्ये आणखी तीन फायदे मिळू शकतात…

(1) किसान क्रेडिट कार्ड
आता किसान क्रेडिट कार्ड देखील पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे. KCC बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. म्हणजेच सरकार ज्याला 6000 रुपये देत आहे, त्यांना KCC बनवणे सोपे होणार आहे. सध्या सुमारे 7 कोटी शेतकऱ्यांकडे KCC आहे, तर सरकारला आणखी एक कोटी लोकांना लवकरात लवकर समाविष्ट करायचे आहे आणि त्यांना 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.

(2) पंतप्रधान किसान मानधन योजना
जर एखादा शेतकरी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत. या योजनेअंतर्गत, शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. त्यामुळे त्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याच्या प्रीमियममधून 6000 रुपये कापले जातील.

(3) किसान कार्ड बनवण्याची योजना आहे
केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या डेटावर आधारित शेतकऱ्यांसाठी Unique farmer ID तयार करण्याच्या तयारीत आहे. हे ओळखपत्र पीएम किसान आणि राज्यांच्या भूमी अभिलेख डेटाबेसशी लिंक करून बनवण्याची योजना आहे. यानंतर शेतीशी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.