जर तुम्ही गाडी विकत असाल किंवा भंगारात देत असाल तर यावरील तसाच Fastag सोडू नका, त्यामुळे काय होऊ शकते नुकसान जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही तुमची जुनी गाडी विकणार असाल किंवा स्क्रॅप करणार असाल तर गाडीमध्ये FASTag लावू नका. FASTag तसाच ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. यासोबतच सायबर क्रिमिनल्‍स तुम्हाला बळी पाडू शकतात आणि तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाडी विकण्यापूर्वी तुम्ही FASTag चे स्टिकर काढले पाहिजे.

सामान्यतः, गाडीचा मालक गाडी विकताना FASTag स्टिकर काढत नाहीत किंवा गाडी जूनी झाल्यावर जंकयार्डला देतात. गाडीच्या मालकांचा असा विश्वास असतो की FASTag जुन्या गाडीचा आहे आणि तो त्याच क्रमांकाशी जोडलेला असतो, त्यामुळे तो आता वापरला जाणार नाही आणि FASTag काढला तरी त्याचा उपयोग नाही. त्यामुळे तो गाडीतच सोडा.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही गाडी विकणार असाल तर FASTag चे स्टिकर काढून टाका, जेणेकरून तुम्हाला FASTag मध्ये असलेले पैसे ट्रान्सफर करता येतील. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी FASTag नंबर अनिवार्य असेल. याद्वारे पैसे तुमच्या दुसऱ्या FASTag वर ट्रान्सफर केले जाऊ शकतात. याशिवाय, जर FASTag बँक खात्याशी लिंक असेल तर गाडी टोलवर गेल्यावर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. FASTag ची लिंक बँकेतून काढता येणार नाही. त्यामुळे गाडी विक्री करण्यापूर्वी FASTag काढून टाकावे.

सायबर क्रिमिनल्‍स चुकीचा वापर करू शकतात
सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया सांगतात की,”जर गाडी भंगारात विकली जात असेल आणि त्यात FASTag असेल तर त्याचा गैरवापर होऊ शकेल. विशेषत: जे FASTag बँकेशी जोडलेले आहेत, त्यात बँकेचे सर्व डिटेल्स असतात. सायबर क्रिमिनल्‍स डिटेल्ससह तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात. त्यामुळे FASTag काढल्यानंतरच गाडी टाकून द्यावी.

Leave a Comment