धक्कादायक !! पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; नराधम बापाला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाप – लेकीचं नात हे मायेचं नात असत अस म्हणल जाते. परंतु आज याच नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणा-या नराधम बापाला रामनगर पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 2 वाजता डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, शेलार नाका परिसरातील त्रिमुर्ती वसाहतीत घडली. क्षयरोगाची लागण झाल्याने  पिडीत मुलीची आई आपल्या तीन मुलींसमवेत वसाहतीत बाजुला घर असलेल्या तीच्या आईकडे राहते.

बाप हा त्याच्या घरात दुपारी झोपला असताना पिडीत मुलगी त्याठिकाणी खेळायला आली होती. त्यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. तीने लागलीच रामनगर पोलीस ठाणे गाठत नव-याविरोधात तक्रार केली. आईने दिलेल्या तक्रारीवरून पिडीत मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश आहेर यांनी दिली. आरोपीला दुपारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like