दारु पिऊन रोज घरी दंगा करणार्‍या मुलाला वडीलांची जबर मारहाण; मुलाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : बाप लेकाच्या घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत लेकाचा मृत्य झाल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे शनिवारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. हणमंत वसंत माळी वय २४ असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हणमंत यांना काठीने व दगडाने मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

कवठेमहांकाळ पोलीसांनी संशयित वडील वसंत रामू माळी वय 76 यांना ताब्यात घेतले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मयत मूलगा हणमंतं माळी यास दारुचे व्यसन होते. हणमंत माळी हा दररोज दारु पिऊन घरी आल्यावर दंगा करत होता. तसेच परिवारातील सर्वाना त्रास देत होता. त्यामुळे वारंवार घरी भांडण होत होते. आज शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मुलगा हणमंत हा घरी आला असता. त्याने वडिला बरोबर वादावादी सुरू केली.

मोटारीला बांधायची दोरी मोठ्या भावाकडून का आणली? असे म्हणून हणमंतं माळी हा दंगा करु लागला. या वेळेस बाप लेकात कडाक्याची वादावादी झाली. वादावादी सहन न झाल्याने बाप लेकात मारहाण झाली व मुलगा हणमंत हा जास्तच शिवीगाळ करु लागला. बाप लेकातील मारहाणीचे पर्यावसन वादात झाले.

दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. यावेळी राग सहन न झाल्याने बापाने मुलाला काठीने व दगडाने मारहाण केली. हणमंत माळी यांच्या डोकीस गंभीर जखम झाल्याने या मारहाणीत मुलगा हणमंत माळी याचा जागीच मृत्य झाला.

घटनेची माहिती समजताच विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. कवठेमहांकाळ पोलीसांनी वसंत रामू माळी यास ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment