धक्कादायक ! सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केला आहे. यामध्ये सून घरात असताना आरोपी सासऱ्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित सुनेने नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सुरेश रामभाऊ पोपते असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सासऱ्याचे नाव आहे. आरोपी पोपते हा सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी सासरा घरी असताना, त्याची सून घरी आली होती. यावेळी सासऱ्याने आपल्या सुनेशी वाद घातला. ‘आमच्या डब्यातील सगळी डाळ तू घेऊन गेलीस’ असा आरोप सासऱ्याने आपल्या सुनेवर केला. डब्यात डाळ आहे का? बघ म्हणत आरोपीनं सुनेला घरात पाठवलं. यानंतर सून घरात गेली असताना अचानक सासऱ्याने घराचा दरवाजा बंद केला आणि सुनेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुनेने प्रसंगावधान दाखवत आरडाओरड केली. यानंतर आपल्या मुलीचा आरडाओरड ऐकून तिचे आई वडील घरात धावून आले. यावेळी आरोपी सासऱ्याने त्यांनाही अश्लील शब्दांत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सुनेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात जाऊन सासरा सुरेश रामभाऊ पोपते याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Leave a Comment