Monday, January 30, 2023

२० वर्षीय नवविवाहितेसोबत सासऱ्याने केली जबरदस्ती; सुनेनं बनवला व्हिडीओ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरर गावात पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आलेल्या नवविवाहित वधूवर तिच्या सासऱ्यानेच जबरदस्ती केली. जेव्हा या नवविवाहित वधूने तिच्या सासूला याबद्दल सांगितले तेव्हा सासूने तिला गप्प रहायला सांगितले. पहिल्यांदा तिच्या नवऱ्याचा तिच्यावर विश्वासच बसला नव्हता. नंतर त्याने सांगितले की, जर ते पुन्हा असे काही करत असतील तर मोबाइलवरून त्याचा व्हिडिओ बनव. दुसर्‍याच दिवशी जेव्हा तिच्या सासऱ्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा त्या वधूने मोबाईलवर काढलेला व्हिडिओ पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी आरोपी सासर्‍याविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली.

पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत, २० वर्षीय नवविवाहित मुलीने १९ डिसेंबर २०१९ रोजी तिचे लग्न झाल्याचे म्हटले आहे. लग्नानंतर तीन दिवसांनी तिच्या सासऱ्याने तिचा विनयभंग केला आणि तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला याबद्दल सांगितले तेव्हा त्याने तिलाच फटकारले. दोन महिन्यांनंतर तिच्या सासऱ्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने या सर्व गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगितल्या.

- Advertisement -

२३ मे रोजी रात्री ती घरी एकटीच होती, तिचा नवरा कामावर गेला होता. त्यवेळी सासऱ्याने तिच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. सकाळी तिने आपल्या सासूला याबद्दल सांगितले, तेव्हा सासूने तिला गप्प राहण्यास सांगितले. जेव्हा या नवविवाहित महिलेने झालेली घटना आपल्या पतीला सांगितली, तेव्हा त्याला पहिल्यांदा विश्वासच बसला नव्हता. मग यावर तो म्हणाला की,”आज रात्री मी घरी येणार नाही. आजही त्याचे वडील तिच्याबरोबर जबरदस्ती करायला आले तर त्याचा मोबाईल वरून व्हिडिओ बनव.”

नवविवाहितेने अगदी असेच केले आणि व्हिडिओ बनविण्यासाठी मोबाइल आपल्या खोलीत लपविला. रात्री, जेव्हा सासरा तिच्या खोलीत आला आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा हे सर्व त्या लपवलेल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले गेले. यांनतर तिने सकाळी ही सर्व गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली. तो मोबाइल व्हिडिओ पोलिसांना देऊन सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर पीडित मुलीच्या सासर्‍याविरूद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एएसआय बलविंदर कौर यांनी सांगितले की, ‘आरोपी हा सध्या फरार असून पीडितेची वैद्यकीय चाचणी सोमवारी करण्यात आली आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.