बाप आहे कि उशाचा साप आहे ; बापानेच केला मुलाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी 

पाटण तालुकयातील तारळे विभागातील कोंजवडे येथे शेणखत भरण्याच्या कामाच्या स्वरूपात मजुरीच्या मिळालेल्या पैशाच्या कारणावरून दारु पेलेल्या बाप-लेकात जोरदार भांडण होऊन यामध्ये भाऊ बापूसाो पवार (वय 55) याने स्वत:चा मुलगा मारूती उर्फ पिन्या पवार (वय 30) याच्या डोक्यात चिडून लोखंडी पारळीने मारहाण करून त्याचा खून केलेची घटना घडली असुन . या घटनेने पाटण तालुकयात खळबळ माजली आहे
मुलगा मारू ती उर्फ पिन्या पवार (वय 30) याचा जागेवरच मृत्यु झाला असुन खुनप्रकरणी वडील भाऊ बापूसाो पवार (वय 55) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असुनउंब्रज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाच्या करणांचा अधिक तपास उंब्रज पोलिस करत आहेत

Leave a Comment