दुसऱ्या पत्नीला मुलगी नकोशी झाल्यामुळे जन्मदात्या बापाने मुलीला दिला गळफास अन्…

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये धक्कादायक म्हणजे आपल्यावर हत्येचा आरोप येऊ नये म्हणून तिच्या बनाव देखील रचला. यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी बापाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. राम माधव धनगरे असे या नराधम बापाचे नाव आहे. या आरोपीने आपल्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यानेच पोलिसांत तक्रार देऊन हा सगळा बनाव रचला होता.

हि पीडित मुलगी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी परिसरात निर्जनस्थळी झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर या चिमुकलीला गळफास कोणी आणि का दिला असावा असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि कुटुंबीयांना बोलावून या मुलीची ओळख पटवली. यानंतर मुलीच्या बापाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता फिर्याद देणाऱ्या बापानेच आपल्या मुलीला फासावर लटकविण्याच कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या मुलीच्या माहितीनंतरच आरोपी कोण आहे हे समजणार होते. यादरम्यान मुलीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुलीच्या खाना खुणांवरून बापावर संशय बळावला आणि त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. यानंतर पोलीस अधिक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत स्वत: याचा तपास केला. तेव्हा हि घटना मुलीच्या नराधम बापाने घडवून आणल्याचे पोलीस तपासात निपन्न झाले. यानंतर पोलिसांनी या नराधम बापाला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

You might also like