अमेरिकेत मुस्लिमांवर लक्ष ठेवत आहे FBI, सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण; नक्की काय घडले ते जाणून घ्या

न्यूयॉर्क । अलीकडेच, अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याची 20 वर्षे पूर्ण झाली. लोकं अजूनही ही घटना लक्षात ठेवून जगत आहेत. त्यावेळी अल-कायदाने कट्टरतावादाच्या नावाखाली न्यूयॉर्क ट्विन टॉवरला विमानाद्वारे उडवले होते. 20 वर्षांनंतरही लोकांसमोर प्रश्न निर्माण होत आहे की, त्यांनी सुरक्षा आणि स्वातंत्र्य यामध्ये कोणाची निवड करावी? अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय नोव्हेंबरमध्ये याबाबत उत्तर देऊ शकते. कॅलिफोर्नियातील मुस्लिम धर्मगुरू इमाम यासिर फाजागा नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर आपल्या प्रश्नांबाबत उभे राहतील.

मुस्लिम धर्मगुरुने FBI विरोधात दाखल केला गुन्हा
एका रिपोर्टनुसार, 2011 मध्ये, फाजागा, इतर दोघांसह आणि अमेरिकन इस्लामिक कौन्सिलच्या मदतीने फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनी आरोप केला की,”FBI मुस्लिमांवर फक्त नजर ठेवत आहे कारण ते मुस्लिम आहेत.”

FBI चा युक्तिवाद काय आहे ?
त्याच वेळी, या आरोपावर, FBI ने असा युक्तिवाद केला की,”त्यांची तपासणी ‘स्टेट सीक्रेट’ आहे आणि जर केस पुढे चालू ठेवली गेली तर ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप धोकादायक ठरू शकते.” नोव्हेंबरमध्ये FBI विरुद्ध फाजागा प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयासमोर पहिला प्रश्न हा असेल की, या प्रकरणात ‘स्टेट सीक्रेट’ विशेषाधिकार न्याय्य आहेत का ? FBI चे म्हणणे आहे की,” कोर्टाला FBI ची चौकशी करण्याचा आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा अधिकार नाही.”

सरकारविरोधात खटला शक्य आहे
डिसेंबर 2020 मध्ये 4 मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयात FBI च्या विरोधात खटला दाखल केला. FBI लोकांना जबरदस्तीने मुस्लिमांची माहिती देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करण्यात आला.’तन्वीर वि तन्झीम’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की,’एखादी व्यक्ती किंवा त्यांचा गट त्यांच्या धार्मिक अधिकारांच्या संरक्षणाच्या आधारावर सरकारच्या एजन्सींविरोधात खटला दाखल करू शकतो.’ आपल्या केसच्या संदर्भात फाजागा म्हणतात की,”नोव्हेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेतला जाईल की, FBI अधिकारी जास्त शक्तिशाली आहेत की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश.”

You might also like