FD Rates : आता ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणूक करण्यासाठी लोकं अजूनही फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) चा वापर करतात. RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा करण्यात आली आहे. ज्यानंतर बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली.यामध्ये आता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे देखील नाव जोडले गेले आहे. या बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Utkarsh Small Finance Bank Ltd. in the city Mumbai

एका मीडिया रिपोर्ट नुसार, 25 जुलैपासून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. बँकेकडून आता 7 दिवस ते 10 वर्ष कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 6.75 टक्के व्याज (FD Rates) मिळेल. त्याच वेळी, सामान्य ग्राहकांना 4.00 टक्के ते 6.25 टक्के व्याज मिळेल. बँकेच्या वेबसाइटनुसार, 181 दिवसांपेक्षा कमी मुदतीच्या FD साठीचे व्याज साध्या व्याजाच्या आधारावर मॅच्युरिटीवर मोजले जाईल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आता 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD वर ग्राहकांना 3 टक्क्यांऐवजी 4 टक्के व्याज (FD Rates) देईल. तसेच ग्राहकांना 46 दिवस ते 90 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.25 टक्के व्याज मिळेल. त्याच बरोबर 91 ते 180 दिवसांच्या FD वर ग्राहकांना 5 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 181 दिवस ते 364 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरही 5.75 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आला आहे. बँकेने आता 365 दिवसांपासून 699 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.15 टक्के व्याजदर (FD Rates) जाहीर केला आहे.

Earn more than 6% interest on your Fixed deposits, read this article  carefully

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर (FD Rates) 700 दिवसांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवले ​​आहेत. बँक आता या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देईल. त्याचप्रमाणे, बँक आता 5 ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर वार्षिक 6.25 टक्के दराने व्याज देईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.utkarsh.bank/deposits/fixed-deposit

हे पण वाचा :

BSNL चे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मंजुर

Multibagger Stock : 5 वर्षात 1460% रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 40% रिटर्न !!!

Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!

Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा