Sunday, February 5, 2023

FD Rates : आता ‘या’ 3 बँका ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज, असे असतील नवीन व्याज दर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणुकीचा पारंपारिक पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला गॅरेंटेड रिटर्न बरोबरच सुरक्षितताही मिळते. RBI ने रेपो दरात आतापर्यन्त चार वेळा वाढ केली आहे. ज्यामुळे बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच फायदा होतो आहे. कारण रेपो दरात वाढ झाल्यापासून बँका FD वरील व्याजदरात वाढ करत आहेत. FD वरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांमध्ये आता एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे नाव देखील सामील झाले आहेत.

ICICI Bank, Yes Bank revise their Fixed Deposit (FD) rates: Check new rates here - BusinessToday

- Advertisement -

हे लक्षात घ्या कि, HDFC बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 15 महिने ते 10 वर्षाच्या FD वरील व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. तसेच कोटक महिंद्रा बँकेने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. या बँकेने नोव्हेंबरमध्ये आतापर्यन्त दोन वेळा व्याजदर वाढवले आहेत. FD Rates

As Kotak Mahindra Bank reports results, here are top five takeaways

कोटक महिंद्रा बँकेच्या FD वरील व्याजदर

आता या बँकेकडून 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.10 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.40 टक्के व्याज दिले जाईल. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या FD वर 0.50 बेसिस पॉईंट्स जास्त व्याज मिळेल. त्याच बरोबर 3 वर्षे आणि त्याहून जास्त मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर आता 6.25 ऐवजी 6.30 टक्के व्याज मिळेल. FD Rates

HDFC Bank news: HDFC Bank receives Rs 30,000 crore prepayments amid signs of economic recovery, deleveraging - The Economic Times

HDFC बँकेच्या FD वरील व्याजदर

आता, HDFC बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांना 3% ते 6.25% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.00% पर्यंत व्याज दिले जाईल. तसेच आता बँकेने 15 महिने 1 दिवसांपासून 18 महिन्यांच्या FD वरील व्याज 6.15% वरून 6.40% पर्यंत वाढवले ​​आहे.

त्याच बरोबर आता बँक 18 महिने ते 2 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर देखील 35 बेसिस पॉईंट्सनी वाढवून 6.50 टक्के केला आहे. तसेच 2 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 6.25% वरून 6.50% पर्यंत वाढवला आहे. आता 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षाच्या FD वर आता नागरिकांना 6.20 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल. FD Rates

What went wrong at Indian Overseas Bank | Mint

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या FD वरील व्याजदर

हे लक्षात घ्या कि, इंडियन ओव्हरसीज बँकेने FD वरील व्याजदरात 60 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. एका निवेदन देताना बँकेने म्हटले की,” 270 दिवस ते एक वर्ष आणि एक वर्ष ते तीन वर्षांच्या FD वरील व्याजदर 60 बेसिस पॉईंट्सनी वाढवले ​​आहेत. आता बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.60% ते 5.85% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, 1000 दिवसांच्या FD वर सर्वाधिक 6.00% व्याजदर दिला जात आहे. तसेच सुपर ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाचे) 0.75% अतिरिक्त दर मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांना इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) 0.50% अतिरिक्त दर मिळेल. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates

हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!