FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता खाजगी क्षेत्रातील साउथ इंडियन बँकेने देखील आपले बचत खाते आणि एफडी वरील व्याजदरात बदल केले आहेत.

South Indian Bank Zero Balance Savings Account - How To Get South Indian  Bank Savings Account Online

20 जुलै 2022 बँकेचे हे नवीन व्याजदर (FD Rates) लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइट वरील माहिती नुसार, बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 2.65 ते 5.85 टक्के व्याजदर दिला जाईल. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.15 ते 6.35 टक्के व्याजदर दिला जातो आहे. तसेच बँक सध्या बचत खात्यावर 4.75 टक्के दराने व्याज देत आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

असे असतील नवीन व्याजदर

साऊथ इंडियन बँक 7 ते 30 दिवसांच्या FD वर 2.65 टक्के आणि 31 ते 90 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याजदर देत आहे. यानंतर 91 ते 180 दिवसांच्या FD वर आता 4.25 टक्के व्याज मिळेल तर 181 ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.60 टक्के व्याज मिळेल. बँक आता 1 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी FD वर 5.60 टक्के आणि 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.75 टक्के देत आहे. यासोबरच 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक आता 5.85 टक्के व्याज दर (FD Rates) देईल.

This private bank revises interest rates on fixed deposits and savings  accounts | Mint

अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. RBI ने मे आणि जूनमध्ये सलग दोन महिने प्रमुख व्याजदर 0.9 ने वाढवले ​​होते. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestRateDetails.aspx?irtID=1

हे पण वाचा :

Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या

Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा

PNB कडून ​​FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा

फक्त 167 रुपयांची बचत करून मिळवा 11.33 कोटींचा मोठा फंड; कसे ते जाणून घ्या

Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?

Leave a Comment