Site icon Hello Maharashtra

FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी देखील FD वरील व्याजदर वाढवले !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  FD Rates  : RBI कडून दोन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांच्या व्याजदरात वाढ केली जाऊ लागली आहे. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून FD वरील व्याजदरातही वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. या दरम्यानच आता आरबीएल आणि धनलक्ष्मी बँकेने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय IDFC फर्स्ट बँकेकडून आपल्या बचत खात्यावरील डिपॉझिट्समधील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. हे सर्व 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहे.

या बँकाकडून वाढवण्यात आलेले हे दर अनुक्रमे 22 जुलै आणि 20 जुलैपासून लागू झाले आहेत. तर IDFC फर्स्ट बँकेच्या बचत खात्यावरील नवीन व्याजदर 20 जुलैपासून लागू झाले आहेत. RBL आणि धनलक्ष्मी बँकांच्या वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, आता ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरापेक्षा 0.50 टक्के अतिरिक्त व्याज (FD Rates) मिळेल. चला तर मग ‘या’ बँकांच्या नवीन व्याजदराबाबत जाणून घेऊयात …

RBL बँकेचे नवीन व्याज दर

RBL बँकेकडून 12 महिने ते 60 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदर (FD Rates) वाढवले आहेत. याशिवाय, इतर कालावधीच्या एफडीवरील व्याज दर आहे तसेच ठेवण्यात आले आहेत. बँकेने 12 महिन्यांपेक्षा जास्त आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के केला आहे. त्याच वेळी, 15 महिन्यांच्या एफडीवर आता ग्राहकांना 6.65 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. आता 15 महिने, 1 दिवस आणि 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के, 24 महिने आणि 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के व्याज दर मिळेल. तसेच ग्राहकांना 36 ते 60 महिन्यांच्या FD वर 6.55 टक्के व्याज मिळेल.

धनलक्ष्मी बँकेचे नवीन व्याज दर

धनलक्ष्मी बँकेने 555 दिवस ते 1111 दिवसांच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच बँकेने 555 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर (FD Rates) 5.55 टक्क्यांवरून 5.80 टक्के केला आहे. त्याच वेळी, 1111 दिवसांच्या FD वर व्याज 0.30 टक्क्यांनी वाढवून 6.05 टक्के केला आहे.

IDFC फर्स्ट बँकेच्या बचत खात्याचे नवीन व्याज दर

बँकेतील 10 लाखांच्या बचत खात्यावर 4 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय 10-25 लाख रुपयांच्या बचत खात्यावर 6 टक्के व्याज दर मिळेल. 25 कोटी ते 100 कोटी रुपयांच्या डिपॉझिट्सवर 5 टक्के, 100-200 कोटी रुपयांच्या डिपॉझिट्सवर 4.50 टक्के आणि 200 कोटी रुपयांवरील डिपॉझिट्सवर 3.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dhanbank.com/interest-rates/

हे पण वाचा :

Prepaid Plans : 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स पहा !!!

Multibagger Stock : 2000 टक्के रिटर्न देणाऱ्या ‘या’ कंपनीकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर !!!

FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!

Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या

PNB कडून ​​FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा