साताऱ्यात जम्बो कोविड सेंटर बाहेर मारामारीत महिला पोलिस जखमी, चाैघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | येथील जम्बो कोविड सेंटरसमोर दोन युवकांना मारहाण करताना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस महिलेस जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गर्दी, मारामारी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज मिठापुरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे व अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा किसन डवरे यांनी फिर्याद दिली आहे. जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर चौघे दोन मुलांना मारहाण करत होते. या वेळी सुमित्रा तेथे गेल्या. या वेळी एकाला मारहाण करत असलेल्यांना त्यांनी विचारणा केली. या वेळी तो कोरोनाबाधित आहे, परंतु टेस्टला नकार देत आहे, म्हणून पकडून नेत असल्याचे दोघे म्हणाले.

दुसऱ्याला मारणारे दोघे म्हणाले, “याने माझ्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केली आहे, तो चोर आहे म्हणून त्याला मारत आहोत, असे त्यांनी सांगितले. परंतु दोन्ही जण वेगळेच सांगत होते. त्यामुळे सुमित्रा यांनी मारहाण करू नका, मला चौकशी करायचे आहे, असे सांगितले. तरीही चौघांनी ऐकले नाही. त्या वेळी सुमित्रा मध्ये गेल्या. तेव्हा संशयितांच्या दांडक्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Leave a Comment