दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात भीषण आग

औरंगाबाद – ऐतिहासिक दौलताबाद (देवगिरी) किल्ल्याच्या परिसरात व जवळच असलेल्या नगर तलाव परिसरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीची व्याप्ती वाढून अग्नितांडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला. या आगी दरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान-मोठे जीवाणु व प्राणी जळून नष्ट झाले, तर मोर, लांडोर व वानरे आदी प्राणी सैरभैर होऊन त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. स्थानिकांनी अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला दरवर्षी आग लागण्याची घटना घडत असते. त्या प्रमाणे शुक्रवारी दुपारी आग लागली व बघता-बघता संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात आगीने रौद्ररूप धारण करीत वेढा दिला. या आगी नतर पर्यटक व ग्रामस्थांना प्रश्न पडला की प्रत्येक वर्षी लागणारी आग ही लागते की लावल्या जाते. याचा तपास आता करण्याची गरज आहे.

दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीव किटाणू यांच्यासह या ऐतिहासिक वारशाला सुद्धा मोठी हानी पोहोचत असते. या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती काळवंडून जात असुन कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता असल्याचे मत पुरातत्त्व अभ्यासक व्यक्त करित आहेत.