लहान मुलांची अश्लील चित्रफीत फेसबुकवर अपलोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

औरंगाबाद | अश्लील चित्रफिती समाज माध्यमांवर टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी दंडात्मक कायदे सुद्धा भारतात आहे. एवढे असूनही काही समजाकंटक हे कुकृत्य करतात. असाच एक कुकृत्य औरंगाबाद येथे घडले आहे. बालकांची अश्लील चित्रफीत फेसबुकवर अपलोड करणाऱ्या मोबाईलधारक विरुद्ध सायबर पोलिसांनी शनिवारी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविला.

बालकांचा अश्लीलकृत्यासाठी वापर करणाऱ्या समाजकंटकांनी विरुद्ध केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष मोहीम उघडली आहेत. या अंतर्गत फेसबुक वरील अमन अमन या नावाचे अकाउंट असलेल्या वापरकर्त्याने लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ क्लिप शेअर केले आहेत.

हा वापरकरता शहरातील असल्याचा अहवाल आणि सीडी छायाचित्रासह मुंबई येथे सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त झाला. यानंतर पोलीस निरीक्षक गीता बागवडे कॉन्स्टेबल सुदर्शन एखंडे आणि आरोपीचे नाव निष्पन्न केले. त्याच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

You might also like