औरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ दुकानदारांविरुद्ध मंगळवारी (दि.१) रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कामगार उपायुक्त शैलेश यशवंत पोळ यांनी यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांची ५६ दुकाने गत महिन्यात सील करण्यात आली होती. या दुकानांचे सील काढावे, याकरिता खा. जलील हे शहरातील २४ दुकानदारांना घेऊन मंगळवारी (दि. १) दुपारी १२:२० वाजता कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी, ‘दुकानाचे सील काढ, तू कामगारांसाठी येथे बसलेला आहे. व्यापाऱ्यांना काय दंड लावणार ते आताच सांग असे उद्धटपणे बोलून पोळ यांच्यावर दबाव टाकला. दुकानाचे सील काढत नाही तोपर्यंत तुलाही उठू देणार नाही, अशी दमबाजी करीत जलील यांनी त्यांना डांबून ठेवले. उपायुक्त पोळ यांनी मंगळवारी रात्री उशिरा क्रांती चौक ठाण्यात खा. जलीलविरुद्ध तक्रार नोंदविली.
यांच्यावर करण्यात आला गुन्हा दाखल
पोलिसांनी जलील यांच्यासहदुकानदार नासेर सिद्दीकी, शेख सलीम शेख शरीफ (एफ.एस. टेलिकॉम मोबाईल शॉप, सब्जी मंडी), राजेश मेहता, ललितकुमार जैन (गजानन गिफ्ट अॅण्ड टॉईज, जालना रोड), अनुप तोलवानी (रुख्मिणी साडी, रंगारगल्ली), मोहम्मद शफिक, (गुलशन क्लॉथ, सिटी चौक), मोहम्मद फारुक (लुकिंग बॉईज कापड दुकान, पैठण गेट) चरणसिंग (पंजाब शूटींग शर्टिंग, सिटी चौक), जहिनी एम. रज्जाक (ऑनेस्टी शॉप, सिटी चौक), नंदू जाधव (सेव्हन लाईट्स अॅण्ड इलेक्ट्रिकल्स, सेव्हन हिल, जालना रोड), सुनील किंगर (गुरुनानक ट्रेडिंग अंगुरीबाग), मोहम्मद पाशा (स्टार फॅशन, रंगारगल्ली), रोहित सावजी (अभय ड्रेसेस, मछलीखडक), मोहम्मद अब्रार (मीना टेक्स, रंगारगल्ली), फईम शेख (सबा कलेक्शन, रंगारगल्ली), कौशिक तोलानी (मनोकामना क्लॉथ, रंगारगल्ली), रहिमखान (झोया कलेक्शन, रंगारगल्ली), शौकत अली (करिश्मा क्लॉथ, रंगारगल्ली), संजय रतन दोसी (रतनलाल मोतीलाल कापड दुकान, मछलीखडक), वसीम शेख (एम.झेड. रंगारगल्ली) कलेक्शन, , मुबीन खान अजमत खान (आर.के. कलेक्शन, कुंभारवाडा), अभिषेक चांडक (चांडक ब्रदर्स, कुंभारवाडा), अनिस कुरेशी (प्लस पॉईट कापड दुकान, रंगारगल्ली), पृथ्वीराज व्यंकटेश कावेटी (अण्णा फॅन्सी फॅशन, रंगारगल्ली) या २४ व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला.