नशा केलेल्या परदेशी तरुणीचा कराडजवळ फिल्मी थरार! पोलिसांनी पाठलाग केला असता अपघात होऊन जीप पलटी

कराड प्रतिनिधी | परदेशी युवतीने एक जीपगाडी चोरी करुन भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर तरुणीने चरस ची नशा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कृषी महाविद्यालय, कराध येथे तिची जीप पलटी झाल्याने ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरी केलेली जीप

रविवारी दुपारी चार च्या सुमाराच चिपळून च्या बाजून आलेल्या एका परदेशी तरुणीने पाटण येथे धुडगुस घातला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली असता सदर तरुणीने एका नजीकच्या दुकानातील महिद्रा जीप पळवून कराडच्या दिशेने पोबारा केला. जीपचा वेग शंभर पार होता आणि वाटेट तिने अनेकांना जोरात कट मारले तसेच दहा-बारा जण थोडक्यात बचावले अशी माहिती प्रत्यक्षदर्शनींनी दिली. अखेर कृषी महाविद्यालय कराड येथे एका वेगनर गाडीला धडक देऊन तिची जीपगाडी पलटी झाली.

परदेशी तरुणी कराड पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, सदर तरुणी गोवाहून आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिने गांजा किंवा चरस यांचे सेवन केले असावे असे बोलले जात आहे. कराड पोलिसांनी सदर तरुणीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.