व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अखेर चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड : वडीलांनीच दिली आरोपी मुलाची पोलिसांना माहिती

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा शहरातील सोनगाव येथे एका 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर शाररीक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि. 21) रोजी उघडकीस आली होती. सोनगाव (ता. जि. सातारा) येथील पॉलिटेक्नीक कॉलेज जवळील निर्जन भागात अत्याचार केल्यानंतर मुलीला सोडून संशयित आरोपी पळून गेला होता. त्यानंतर संशयित आरोपी स्वतः एका गुन्ह्यात पोलिसांच्याकडे हजर झाला होता, अशावेळी त्याच्यावरती पोलिसांचा संशय घेतला गेला नव्हता. मात्र, आरोपीच्या वडिलांनी व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणारा आपला मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील फोडजाई मंदिरासमोर मोकळ्या जागेत तिच्या आई सोबत झोपलेल्या 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला मोटार सायकवरुन घेवून जावून तिच्यावर शाररीक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि. 21) रोजी उघडकीस आली होती. नमूद गुन्ह्याांचे गांभीर्य लक्षात घेवून अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल सहा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक सातारा तालूका पोलीस ठाणे, भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सातारा शहर पोलीस ठाणे, सातारा तालूका पोलीस ठाणे येथील तपास पथके नमुद आरोपीच्या शोधकामी रवाना झाली.

तपास पथकांनी पिडीत अल्पवयीन मुलीचे ज्या ठिकाणावरुन अपहरण झाले, त्या ठिकाणापासून ती ज्या ठिकाणी मिळून आली. त्या ठिकाणा पर्यंतचे तसेच सातारा शहरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशईत इसम मोपेड गाडीवरुन जाताना दिसला. फुटेजमधील पिडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडे विचारपुस केली असता. दि.१९/०३/२०२२ रोजी रात्री १०.३० वा. चे. सुमारास नमुद इसमाने पोवईनाका येथे मुलीच्या नातेवाईकांशी भांडण केल्याचे सांगीतले होते. त्याप्रमाणे नमुद फुटेजमधील संशयित इसमाचा शोध घेण्याचा तपास पथकाने प्रयत्न केला. परंतू काही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.

दिनांक २२/३/२०२२ रोजी रात्री २०.०० वा. सदर संशयित इसमाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आले होते. तसेच सदरचे फुटेज बातमीदार लोकांनादेखील दाखविण्यात आले. तरीदेखील नमुद इसमाबाबत काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. दिनांक २४/३/२०२२ रोजी नमुद संशयित इसमाच्या वडीलांनी व भावाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले. फुटेजमधील इसमास त्याच्या वडीलांनी ओळखून तो त्यांचा मुलगा असल्याचे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना फोन करुन सांगितले.

नमुद गुन्हयातील आरोपीने दिनांक २१/३/२०२२ रोजी सदरचा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी शाहुपूरी पोलीस एका गुन्हयात स्वतःहून हजर झाला. तद्नंतर त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने तो जिल्हा मध्यवर्ती कारागृह सातारा येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. त्यास आज दिनांक २५/३/२०२२ रोजी विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी सातारा तालूका गु.र.नं. १२५/२०२२ भादविक ३४६ (अ), ३६६, ३२३ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ या गुन्हयाच्या तपासकामी मा. न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेवून त्याच्याकडे नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता‌. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.

अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आंचल, दलाल सहायक पोलीस अधीक्षक, सातारा उप-विभाग यांचे मार्गदर्शनाखाली किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे, भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सातारा तालुका पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाणे येथील तपास पथकाने नमुद गुन्हा उघडकीस आणला आहे.