व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांचे खासगी कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी शनिवारी इंडिया इंकला संबोधित करतांना भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बनविण्यासाठी नव्याने गुंतवणूकीची मागणी केली. त्या म्हणाल्या की,”अशी वेळ आली आहे की जेव्हा भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बयायला हवा. कॉर्पोरेट जगाने आपली क्षमता वाढवून गुंतवणूक करावी.”

त्या पुढे म्हणाल्या की, “आपल्याला आपली क्षमता वाढवणे आणि त्याचा विस्तार करणे आवश्यक आहे, अशी अनेक उत्पादने तयार करण्याची गरज आहे जी अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्वाची आहेत.” अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा आर्थिक कामांच्या रुळावर परत येण्याची आशा व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की,”सरकारने उचललेली पावले आणि उद्योगाच्या सहभागामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) पुन्हा रुळावर येईल, अशी मला आशा आहे.”

त्या म्हणाल्या की,”करात कपात झाल्यानंतर भारतात वेगवान वाढ होण्याची मला अपेक्षा आहे. मला खासगी क्षेत्राकडून आणखी गुंतवणूकीची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कॉर्पोरेट टॅक्स रेटमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी घट केली होती.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.