इंधन दरवाढ हे धर्मसंकट; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलच्या प्रचंड मोठ्या दरवाढीने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत विचारलं असता त्यांनी हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे

यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं. या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे

भारतात पेट्रोल, डिझेलच्या वाढ होण्यामागचं प्रमुख कारण काय?खरे तर पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डिलरचे कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. दिल्लीत पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like