सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोरोना सेंटरला 1 लाख 25 हजारांचे अर्थसहाय्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतीनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये. याकरिता सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावर्षीही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला 25 ऑक्सिजन सिलेंडरसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. सत्यजित पाटणकर यांनी बांधिलकी म्हणून गतवर्षीही सेंटरला नवीन बेडसह 25 ऑक्सिजन सिलेंडर दिले होते.

गतवर्षी पाटण तालुक्यात कोरोनाने कहर केला होता. तालुक्यात ऑक्सिजनची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कराड व सातारा याठिकाणी पाठवावे लागत होते. मात्र तेथेही बेड व आक्सिजन उपलब्ध न मिळाल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी पाटण येथे ऑक्सिजन बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी समाजातून मागणी होत होती. प्रशासनाकडूनही सामाजिक घटकांनी एकत्रित येवून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

सत्यजित पाटणकर यांनी गंभीर दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला नवीन बेडसह 25 ऑक्सिजन सिलेंडर दिले. तसेच ही सर्व यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे काही रुग्णांचे प्राणही वाचले होते. यावर्षीही सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यात कोरोनाने कहर केला असून, कराड व सातारा येथे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या 25 ऑक्सिजन सिलेंडरसह बेड उपलब्ध आहेत. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता. पुढील काळात ऑॅक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासू नये म्हणून तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी सामाजिक संघटनांनी पुढे येवून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत मदतीबाबत चर्चा केली. लवकरच अतिरिक्त 25 ऑक्सिजन सिलेंडबर पाटणमधील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होतील.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment